Ad will apear here
Next
‘‘लायन्स क्लब’मुळे पोलिसांना घरच्या जेवणाचा आस्वाद’
श्रीकांत तरवडे यांचे प्रतिपादन

पुणे : ‘गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले. या भोजनव्यवस्थेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलिस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासत नाही,’ असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी केले. 

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले होते. गेल्या १५ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते.  लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, सचिव अनिल सुगंधी, खजिनदार विक्रम ओसवाल, कल्पेश पटनी, प्रविण ओसवाल यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि आणि रांगोळीच्या पायघडया घालणाऱ्या राष्ट्रीय कला अकादमीच्या तीनशे स्वयंसेवकांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ८०० ते १००० लोक जेवण करतात. घरगुती पोळ्या, भाजी, पुलाव व गुलाबजाम आदी पदार्थ यामध्ये असतात.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVPCE
Similar Posts
प्रदूषणविरहित गणपती विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार पुणे : ‘दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी दोन या संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात (दि. ११ व १२ सप्टेंबर २०१९) ‘प्रदूषण विरहित
२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आर्जवाबरोबरच त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात छोट्या-मोठ्या मिळून एकूण २२०० गणेशमूर्ती व साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आले
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language